जळगावात ३ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त; तरुणाला अटक
जळगाव, 30 डिसेंबर, (हिं.स.) शहरातील तांबापुरा परिसरात मच्छीमार्केट भागात गांजाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घरात साठवणूक करणाऱ्या एका तरुणावर एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई करत अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १९ हजार ३२० रुपये किमतीचा
जळगावात ३ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त; तरुणाला अटक


जळगाव, 30 डिसेंबर, (हिं.स.) शहरातील तांबापुरा परिसरात मच्छीमार्केट भागात गांजाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घरात साठवणूक करणाऱ्या एका तरुणावर एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई करत अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १९ हजार ३२० रुपये किमतीचा ३ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना तांबापुरा परिसरात गांजाची अवैध विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकला. शासकीय वाहन दूर उभे करून पथक पायी संशयिताच्या घराकडे गेले असता, एक तरुण हातात गोणी घेऊन बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले नाव शेख अशपाक शेख मेहमुद (वय २३, रा. मच्छीबाजार, तांबापुरा) असे सांगितले. त्याच्याकडील गोणीची तपासणी केली असता त्यात गांजा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचनामा करून ३ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी शेख अशपाक याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande