धुळे : तरुण दाम्पत्याची गळफास घेत आत्महत्या
धुळे , 30 डिसेंबर (हिं.स.) शिरपूर तालुक्यातील सटीपाणी शिवारात तरुण दाम्पत्याने शेतात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. सटीपाणी येथील रहिवासी मांगिलाल पावरा हे आपल्या शेतात गेले हो
धुळे : तरुण दाम्पत्याची गळफास घेत आत्महत्या


धुळे , 30 डिसेंबर (हिं.स.) शिरपूर तालुक्यातील सटीपाणी शिवारात तरुण दाम्पत्याने शेतात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. सटीपाणी येथील रहिवासी मांगिलाल पावरा हे आपल्या शेतात गेले होते. त्यावेळी त्यांना शेतातील निंबाच्या झाडाला मुलगा पप्पू मांगिलाल पावरा (वय २३) त्याची पत्नी लक्ष्मी पप्पू पावरा (वय १९) यांनी दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. अवघ्या १९ आणि २३ वर्षांच्या या तरुण दाम्पत्याने टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे हे करत आहेत. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह खाली उतरवले. त्यानंतर खाजगी वाहनाने मृतदेह शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दोन्ही मृतदेह कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल लांबोळे यांनी मृत घोषित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande