खेड उपविभागीय कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
रत्नागिरी, 1 ऑक्टोबर, (हिं. स.) : पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कुदळ मारून आणि कोनशिला अनावरण करुन खेडच्या उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजन आज करण्यात आले. यावेळी सामंत म्हणाले, प्रांत कार्यालयासाठी ५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हे कार्यालय सर्व
खेड उपविभागीय कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन


रत्नागिरी, 1 ऑक्टोबर, (हिं. स.) : पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कुदळ मारून आणि कोनशिला अनावरण करुन खेडच्या उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजन आज करण्यात आले.

यावेळी सामंत म्हणाले, प्रांत कार्यालयासाठी ५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हे कार्यालय सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य जनतेला स्वत:च्या घरात गेल्यासारखे या कार्यालयातील वातावरण हवे, असे ते म्हणाले.

यावेळी आमदार योगेश कदम, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी शिवाजी जगताप, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, अण्णा कदम, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande