युध्दासंदर्भातील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
चंद्रपूर, 9 मे (हिं.स.)।सद्यस्थितीत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण बघता विविध माध्यमातून ब्लॅकआऊट किंवा युध्दासंदर्भात येणा-या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना केले आहे. शासनाच्या मार
युध्दासंदर्भातील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन


चंद्रपूर, 9 मे (हिं.स.)।सद्यस्थितीत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण बघता विविध माध्यमातून ब्लॅकआऊट किंवा युध्दासंदर्भात येणा-या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना केले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार या संदर्भातील अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी नागरिकांना आश्वस्त केले.

युध्दजन्य परिस्थिती, मॉक ड्रील, ब्लॅकआऊट संदर्भात वृत्तांकन करणारे विविध प्रसारमाध्यमे किंवा सोशल मिडीयातून विविध प्रकारचे फोटो किंवा व्हिडीओ प्रसारीत करण्यात येतात. सदर बाबी अधिकृतच असेल याची खात्री देता येत नाही, किंबहुना ते पूर्वीचेसुध्दा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे युध्द किंवा ब्लॅकआऊट संदर्भातील प्रशासनाकडून आलेली माहितीच अधिकृत समजावी. तसेच या संवेदनशील काळात सोशल मिडीया हाताळतांना जबाबदारीचेसुध्दा भान ठेवावे. आपल्याकडून अफवा पसरणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande