रत्नागिरी : चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा
रत्नागिरी, 1 ऑक्टोबर, (हिं. स.) : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आली आहे. १ स्वातंत्र्यलढा आणि सावरकर, २ शिक्षणाचा दर्जा घसरतोय?, ३ राजकारण ... नको रे बाबा,
रत्नागिरी : चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा


रत्नागिरी, 1 ऑक्टोबर, (हिं. स.) : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आली आहे.

१ स्वातंत्र्यलढा आणि सावरकर, २ शिक्षणाचा दर्जा घसरतोय?, ३ राजकारण ... नको रे बाबा, ४ सोशल मीडियाचे जग किंवा ५ मला लिहायचंच नाहीये या पाचपैकी एका विषयावर निबंध लिहायचा आहे. विजेत्या पहिल्या तीन निबंधांसाठी अनुक्रमे २०००, १५०० आणि १००० रुपये, तर उत्तेजनार्थ प्रत्येकी ५०० रुपयांची दोन बक्षिसे आणि प्रशस्तीपत्र दिले जाईल. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.

स्पर्धा खुल्या गटासाठी आहे. स्पर्धक रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी असावा. निबंध मर्यादा कमीत कमी १००० ते जास्तीत जास्त १२०० शब्द आहे. निबंध - ए ४ साईजच्या पेपरवर पुरेसा समास सोडून कागदाच्या एकाच बाजूला स्वहस्ताक्षरात लिहिलेला असावा. निबंधावर कोठेही आपले नाव, पत्ता लिहू नये. वेगळ्या कागदावर आपले नाव, पूर्ण पत्ता आणि मोबाइल नंबर लिहावा. अक्षर, शुद्धलेखन विषयाची समज, विषय मांडणी, भाषा शैली, एकंदरीत प्रभाव याला परीक्षणात महत्त्व राहील.

निबंध स्वतः, पोस्ट, कुरिअर किंवा अन्य मार्गाने संस्थेच्या कार्यालयात २७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पाठवावेत. कार्यालय मंगळवारी बंद असते, तर इतर दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत खुले असते. अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृह, जोशी पाळंद, रत्नागिरी ४१५६१२ असा कार्यालयाचा पत्ता आहे. स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस समारंभ १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येईल. वेळेबाबत कळविण्यात येईल.

अधिक माहितीसाठी कार्यवाह राजेंद्र पटवर्धन (९८६०३६६९९१), कार्यकारी सदस्य अॅड. अविनाश काळे (९४२२३७२२१२) किंवा कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी (९४०४३३२७०५) यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande