धुळे, 1 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात संपन्न झाली. बैठकीस सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत खोंडे, दूरसंचार विभागाचे श्री.शिंदे, तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्य उपस्थित होते.
बैठकीत सर्व नवनियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांनी त्यांचा परिचय करुन दिला. यावेळी सर्व नवनियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांना सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत यांनी पुष्पगुच्छ देवून सर्व सदस्यांचे स्वागत केले.
बैठकीत ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्यांनी त्यांना प्राप्त झालेल्या निवेदन, अर्ज कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केले. सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती. भगत यांनी सदस्यांनी सादर केलेल्या निवेदन,अर्जावर संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी सादर करण्यात येईल असे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर