रत्नागिरी, 9 मे, (हिं. स.) : येथील वीरश्री ट्रस्ट आणि धन्वंतरी रुग्णालयातील रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून चिपळूण आणि राजापूर तालुक्यात आशा सेविकांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिर झाले.
चिपळूण तालुक्यातील खरवते प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा सेविकांसाठी झालेल्या शिबिरावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपा मयेकर, पर्यवेक्षिका समृद्धी वाघे, पर्यवेक्षक आर. जी. जानवलकर, एस. के. महाडीक, गटप्रवर्तक आश्लेषा सावंत उपस्थित होत्या.
कापरे प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या शिबिरावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश यादव, डॉ. अनिकेत गायकवाड, अनिल शिरडे, भूवेश जाधव, प्रणाली दुमाने, गटप्रवर्तक स्वाती वरवडेकर आदी उपस्थित होते. चिपळूण तालुक्यातील रामपूर येथे झालेल्या शिबिरावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ एन. बी. शिर्के पर्यवेक्षक डी. एम. साळवी, व्ही. जी. जानवलकर, गटप्रवर्तक वर्षा मोहिते उपस्थित होत्या.
राजापूर तालुक्यात रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरतर्फे शिबिर घेण्यात आले. तालुक्यातील जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिबिरावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संयुक्ता घाडगे, सुपरवायझर पी. डी. नाईक, पर्यवेक्षक एस. व्ही. कोटकर, गटप्रवर्तक ए. एस. मोरे उपस्थित होत्या. कारवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्गदर्शन शिबिरावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सायली पाध्ये, डॉ. अक्षय कांबळे, पर्यवेक्षक श्री. चांदूरकर, टी. बी. पाटील, गटप्रवर्तक स्वरा नलावडे उपस्थित होत्या. रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरकडून श्वेता कदम आणि अनुष्का होरंबे यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरांमध्ये आशा सेविकांना आरोग्य क्षेत्रातील नवनवीन बदलाबाबत, आधुनिक उपचार पद्धतीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले होते. या शिबिराचा उपयोग झाल्याचे आशा सेविकांकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी