वाहनांसह चालकांना जाळून टाकण्याचीदिली धमकी
सावर्डी येथील घटना, चार आरोपी विरोधात गुन्हे दाखल अमरावती , 18 ऑक्टोबर (हिं.स.) : ओव्हरलोड वाहतूक आणि वाहनांतून उडणाऱ्या राखेचा मुद्दा माध्यमांनी उचलल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने वाहनांवर कार्यवाहीचा धडाका सुरू केला.यामध्ये तीन दिवसात पंधरा व
वाहनांसह चालकांना जाळून टाकण्याचीदिली धमकी सावर्डी येथील घटना


सावर्डी येथील घटना, चार आरोपी विरोधात गुन्हे दाखल

अमरावती , 18 ऑक्टोबर (हिं.स.) : ओव्हरलोड वाहतूक आणि वाहनांतून उडणाऱ्या राखेचा मुद्दा माध्यमांनी उचलल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने वाहनांवर कार्यवाहीचा धडाका सुरू केला.यामध्ये तीन दिवसात पंधरा वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली मात्र नियमानुसार वाहतूक करणाऱ्या काही वाहनांना अडवून चालकांना मारहाण करण्याच्या काही घटना उघडकीस आल्या. यामध्ये नांदगाव पेठ व माहुली जहागीर पोलिसात अज्ञात आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,१५ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पामधून वाहन क्र.यूपी ६४,बीटी ८५६३ व यूपी ६४,बीटी ८७९३चे चालक राखेची वाहतूक करतांना सावर्डी येथील टी पॉईंट जवळ एका बोलेरो वाहनाने हे दोन्ही ट्रक थांबविले. बोलेरो वाहनांतून अज्ञात चार आरोपींनी दोन्ही ट्रकचालकांना ओव्हरलोड गाडी कशी काय चालवत आहे म्हणून वाहनाची आरसी मागितली.चालकाने आरसी मालकाकडे असल्याचे सांगताच भडकलेल्या आरोपींनी दोन्ही वाहनांच्या चालकांना बेदम मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली तसेच यापुढे या मार्गावर वाहन दिसल्यास वाहनांसह दोन्ही चालकांना जाळून टाकण्याची धमकी दिली. भयभीत झालेले दोन्ही चालक तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांनी नांदगाव पेटज पोलिस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल करत पोलिसांना आपबिती सांगितली. पोलिसांनी फिर्यादी चालक कृष्णकुमार नन्हकुमार कनोजिया,वय २९,हातीम अन्सारी रा.माहुली जहागीर यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध बीएनएस १२६(२),२९६,११५(२), ३५१(२)कलमान्वये गुन्हा दाखल त्या अज्ञात चार आरोपींचा शोध घेत आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर चोवीस तासात आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते मात्र लवकरच आरोपी तुरुंगात असतील अशी ग्वाही पोलिसांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande