राज्य सब-ज्युनियर बुद्धिबळ निवड स्पर्धेत श्लोक शरणार्थी, ईश्वरी जगदाळेची बाजी
नाशिक , 21 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित h2e पॉवर सिस्टिम्स महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर (अंडर-15) खुली आणि मुलींची फिडे रेटिंग निवड बुद्धिबळ स्पर्धा 2024 चा अंतिम दिवस थरारक ठरला. खुल्या गटात श्लोक शरणार्थीने आणि म
महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर बुद्धिबळ निवड स्पर्धांमध्ये खुल्या गटात श्लोक शरणार्थीने तर मुलींच्या गटात ईश्वरी जगदाळेने मारली बाजी


नाशिक , 21 ऑक्टोबर (हिं.स.)।

नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित h2e पॉवर सिस्टिम्स महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर (अंडर-15) खुली आणि मुलींची फिडे रेटिंग निवड बुद्धिबळ स्पर्धा 2024 चा अंतिम दिवस थरारक ठरला. खुल्या गटात श्लोक शरणार्थीने आणि मुलींच्या गटात ईश्वरी जगदाळेने आपापली बाजी मारत विजेतेपदावर कब्जा केला.

स्पर्धेत खुल्या गटात आणि मुलींच्या गटात खालील विजेते घोषित झाले:

खुल्या गटातील विजेत्यांमध्येश्लोक शरणार्थी.मानस गायकवाड, हर्ष घाडगे, प्रथमेश शेरला ,ललितदिताय्यानार बूमीनाथनआदित्य जोशी , शाश्वत गुप्ता, कश्यप खाखरिया , आर्या बागायतकर ,अक्षज पाटील

मुलींच्या गटातील विजेते:

ईश्वरी जगदाळे प्रिशा मरगज, साची कुलकर्णीवैष्णवी मानकर, भूमिका वाघळे, पल्लवी डे, तनिष्का राठी– सारा हरोल,सायना नागरकट्टे, द्रिष्या नाईक

या विजेत्यांना रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. विशेषतः, खुल्या गटातील पहिल्या 4 विजेते आणि मुलींच्या गटातील पहिल्या 5 विजेते महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करतील.

स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून अथर्व गोडबोले यांनी काम पाहिले, तर मुख्य सहाय्यक पंच मंगेश गंभीरे आणि सहाय्यक पंच शार्दूल तापसे, श्रद्धा विंचवेकर, योगेश रवनंदळे यांनी पंच व्यवस्था सांभाळली.

स्पर्धेच्या आयोजनासाठी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे, सचिव सुनील शर्मा, खजिनदार जयेश भंडारी, विनायक वाडिले, भुषण पवार, जयराम सोनवणे यांनी विशेष मेहनत घेतली. कालिका मंदिर ट्रस्ट आणि अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande