नाशकात राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
नाशिक , 21 ऑक्टोबर (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशानुसार जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने आणि नाशिक व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने नाशिकमध्ये १४ वर्ष
नाशकात राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ


नाशिक , 21 ऑक्टोबर (हिं.स.)।

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशानुसार जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने आणि नाशिक व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने नाशिकमध्ये १४ वर्षे मुले आणि मुली या गटाच्या महाराष्ट्र राज्य शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथील मीनाताई ठाकरे इनडोअर स्टेडियम, पंचवटी, नाशिक येथे आयोजित या स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी क्रीडा विश्वातील महान खेळाडू मेजर ध्यानचंद आणि खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून या स्पर्धेचे उदघाटन केले. तसेच प्रत्यक्ष मैदानात जाऊन क्रीडांगणाची पूजा करून आणि श्रीफळ वाढवून या स्पर्धेचे उद्घाटन केले.

यावेळी खेळाडूंना संबोधित करतांना त्यांनी सांगितले की, खेळाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे खेळाडूंनी या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास घडवावा असे सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंके यांनी या कार्यक्रमाचे प्रस्तिविक केले. सर्व मान्यवरांचे स्वागत जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब जाधव यांनी केले. या राज्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या लो;जापूर, नागपूर, लातूर, अमरावती, मुंबई, पुणे, संभाजी नगर आणि नाशिक विभाग अश्या आठ विभागातील १९२ खेळाडू सहभागी झाले आहेत. तर निवड चाचणीसाठी ८० खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक यांची निवास आणि भोजन व्यवस्था विभागी क्रीडा संकुल येथील वसतिगृह येथे करण्यात आली आहे. उदघाटनानंतर स्पर्धांना सुरुवात झाली. मुलांच्या गटात कोल्हापूर आणि लातूर विभागाच्या संघांनी उत्तम कामगिरी करून आपले दोन सामने सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली. तर मुलीच्या गटात कोल्हापूर, नागपूर, लातूर आणि पुणे या संघांनी सुंदर खेळ करून विजयी सुरवात केली.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande