व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलामध्ये धाराशिव तर मुलीमध्ये पुणे संघाला विजेतेपद
नाशिक , 22 ऑक्टोबर (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशानुसार जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने आणि नाशिक व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने नाशिकमध्ये १४ वर्षे
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल  स्पर्धा  मुलामध्ये धराशिव तर मुलीमध्ये पुणे संघाला विजेतेपद. दोन्ही गटात कोल्हापूर उपविजयी.


नाशिक , 22 ऑक्टोबर (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशानुसार जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने आणि नाशिक व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने नाशिकमध्ये १४ वर्षे मुले आणि मुली या गटाच्या महाराष्ट्र राज्य शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथील मीनाताई ठाकरे इनडोअर स्टेडियम, पंचवटी, नाशिक येथे आयोजित या स्पर्धेमध्येमुलांच्या गटात चुरशीच्या अंतीम लढतीत लातूर विभागाच्या धाराशिव संघाने कोल्हापूर संघावर २५-१९, १८-२५,२५-२१,२५-१७ असा ३-१ फरकाने पराभव करून विजेतेपद मिळविले. तर नागपुर संघाने तिसरा क्रमांक मिळविला. मुलींच्या गटात पुणे संघाने सुंदर खेळाचे प्रदर्शन करुन अंतीम लढतीत कोल्हापूर संघाला पराभूत करून विजेतेपद संपादन केले तर तिसऱ्या क्रमांकासाठी खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या लढतीत लातूर संघाने नागपुर संघाचा ३-२ असा पराभव करून तिसरे स्थान मिळविले. विजेता पहील्या तीन संघांना प्रमूख पाहुणे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, अविनाश टिळे, क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, महेश पाटील, संदीप ढाकणे यांच्या हस्ते अकर्षक चषक आणि मेडल्स प्रदान करून गौरवण्यात आले.

या वेळी बोलतांना आनंद खरे यांनी सांगितले की १४ वर्षे गट ही स्पर्धेची पहिली पायरी आहे. त्यामूळे या वयापासूनच खेळाडूंनी मेहनत करून आपल्या खेळात प्रगती साधावी असे सांगून खेळाडूंचे अभिनंदन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले.

या राज्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या कोल्हापूर, नागपूर, लातूर, अमरावती, मुंबई, पुणे, संभाजी नगर आणि नाशिक विभाग अश्या आठ विभागातील १९२ खेळाडूनी सहभाग नोंदवला. सर्व खेळाडू, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक यांची निवास आणि भोजन व्यवस्था विभागीय क्रीडा संकुल येथील वसतिगृह येथे करण्यात आली होती.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा कर्यालाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे दिनेश जाधव आणि सहकारी यांनी परिश्रम घेतले.

अंतीम निकाल - मुले-१) छत्रपती संभाजी नगर - विजेता संघ 2) कोल्हापूर - उपविजेता संघ 3) नागपुर - तिसरा क्रमांक.

मुली - १) पुणे - विजेता संघ.2) कोल्हापूर - उपविजेता संघ 3) लातूर - तिसरा क्रमांक.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande