भंडारा : पिंपळगाव येथे एकाच रात्री 4 दुकाने फोडली
भंडारा, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पिंपळगाव - सडक येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ४ दुकाने फोडली.यात किराणा दुकान, मेडिकल,चप्पल दुकान व ग्राहक सेवा केंद्राचा समावेश आहे.दुकानांचे शटर तोडून सुमारे ६ हजार र
भंडारा : पिंपळगाव येथे एकाच रात्री 4 दुकाने फोडली


भंडारा, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पिंपळगाव - सडक येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ४ दुकाने फोडली.यात किराणा दुकान, मेडिकल,चप्पल दुकान व ग्राहक सेवा केंद्राचा समावेश आहे.दुकानांचे शटर तोडून सुमारे ६ हजार रुपये चोरून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली.यामुळे परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट असून यापूर्वी शेतशिवारातील पाण्याची मोटारपंपाची चोरी झाली होती.या घटनांमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांनी रात्र गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. लाखनी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.तर ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar


 rajesh pande