अमरावती30 ऑक्टोबर (हिं.स.)
इतवारा बाजार येथील राजू नमकीन दुकानात गुन्हेशाखेचे पथक आणि अन्न व प्रशासन विभागाने संयक्त कारवाई करून ३३० किलो हलवा व बर्फी (किंमत ८७ हजार २९० रुपये) जप्त करून दुकानदाराला ताब्यात घेतले. राजेश नंदकिशोर साहू असे दुकानदाराचे नाव आहे. इतवारा बाजार येथे राजेश साहू यांच्या
मालकीचे राजू नमकिन नावाने मिठाईचे दुकान आहे तसेच दुकानात ठेवलेल्या मिठाईच्या बॉक्सवर बॅच नंबर नाही आणि हलवा नियमानुसार ठेवलेला नाही तसेच खवा सुध्दा बनावट असल्याची माहिती गुन्हेशाखेच्या पथकाला मिळताच त्यांनी अन्न व
औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी राजू नमकीन दुकानात घाड टाकली आणि दुकानाची पाहणी केली असता दुकानातील मिठाईच्या बॉक्सवर बॅच नंबर नव्हते. तसेच हलवा ज्या पध्दतीने व पाहिजे त्या तापमानात ठेवायला पाहिजे त्या पध्दतीने ठेवलेला नव्हता. तसेच एका प्लॅस्टीकच्या पोत्यात खवा दिसताच पोलिसांनी दुकानातील सर्व मिठाई, हलवा आणि खवा जप्त करून राजेश साहूला ताब्यात घेऊन कारवाई केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी