गडचिरोली., 30 ऑक्टोबर (हिं.स.)अहेरी विधानसभा क्षेत्रातील नामनिर्देशन पत्र भरलेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची आज छाननी करण्यात आली.29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी 17 उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. आज त्या नामांकन पत्राची छाननी करण्यात आली त्यामध्ये दोन नामांकन अवैध ठरवण्यात आले. यामध्ये तनुश्री आत्राम व ऋषी पोर्टेट यांचे नामांकन अवैध ठरले. तर 14 उमेदवारांचे नामांकन पत्र वैध ठरविण्यात आले आहे.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून धर्मराव बाबा आत्राम, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम,बहुजन समाज पार्टी कडून रमेश गावडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप कोरेत, प्रहार जनशक्ती पक्षाकडून नीता तलांडी, अपक्ष म्हणून अवधेश राव आत्राम, अजय आत्राम, अंबरीश राव आत्राम,दीपक आत्राम,महेश कुमराम, शैलेश गेडाम,नितीन पदा, भाग्यश्री लेकामी, हनुमंतु मडावी यांचे नामांकन वैध ठरले असूनकाँग्रेस तर्फे इच्छुक उमेदवार हनुमंत मडावी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला आहे.त्यामुळे महा विकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. त्यासोबतच माझी पालकमंत्री राजे अंबरीश राव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केल्याने महायुती बंडखोरी झाली आहे. त्यासोबत नीता तलांडी ह्यांनी प्रहार जनशक्ती तर्फे उमेदवारी अर्ज सादर केला आहे.त्या माजी आमदार, काँग्रेस नेते पेंटा रामा तलांडे यांच्या कन्या आहेत.त्यामुळे महाविकास आघाडी बंडखोरावर कितपत नियंत्रण आणते ते येत्या 4 नोव्हेंबर ला च कळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond