लातुर येथे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवणार
लातूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।भारतीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम घोषित होणार आहे. लातूर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक विषयक विविध कामे सुरळीत व कालमर्यादेत पार पाडण्यासाठी तसेच मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण
लातुर येथे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवणार


लातूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।भारतीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम घोषित होणार आहे. लातूर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक विषयक विविध कामे सुरळीत व कालमर्यादेत पार पाडण्यासाठी तसेच मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रमातंर्गत शाळा, महाविद्यालयाच्या ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय दंडाधिकारी निवडणूक निणर्य अधिकारी रोहिणी नेऱ्हे-विरोळे यांनी या अनुषंगाने संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, बीलएलओ, पर्यवेक्षक यांची बैठक घेवून सूचना दिल्या.

मागील लोकसभा निवडणूकीमध्ये लातूर शहर मतदारसंघामध्ये मतदान जनजागृती संदर्भात मतदार जागृती रॅली, विविध स्पर्धा, विधाता गट स्थापन करणे, पालक मेळावा, स्वाक्षरी मोहित, सेल्फी पॉईंट तयार करणे, दिव्यांग मतदारांना संकल्प पत्र देणे, चुनावी पाठशाला इत्यादी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले होते.लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनीदेखील आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये जास्तीत जास्त मतदान करुन लोकशाही बळकट करण्याचे व लातूर शहर मतदरसंघाची मतदान टक्केवारी वाढविण्याचे आवाहन लातूर शहर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निणर्य अधिकारी रोहिणी नेऱ्हे- विरोळे यांनी केले आहे.तसेच मागील लोकसभा निवडणूकीमध्ये ज्या शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, बीएलओ, पर्यवेक्षक यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिने चांगल्या प्रकारे उपक्रम राबविले अशा 10 शाळा, महाविद्यालयांना मतदान जनजागृती (स्वीप) अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देवून यावेळी सन्मानित करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande