अमरावती व मेळघाट व्याघ्र प्रकल्प तर्फे इको वॉलेंटियर कार्यशाळेचे आयोजन
अमरावती4 ऑक्टोबर (हिं.स.) वन्यजीव सप्ताह निमित्त्याने वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती (वेक्स) तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्प संचनालय, अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी इको व्हालेंटीयर कार्यशाळा या एकदिवसीय पर्यावरण
वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती व मेळघाट व्याघ्र प्रकल्प तर्फे इको वॉलेंटियर कार्यशाळेचे आयोजन


अमरावती4 ऑक्टोबर (हिं.स.) वन्यजीव सप्ताह निमित्त्याने वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती (वेक्स) तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्प संचनालय, अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी इको व्हालेंटीयर कार्यशाळा या एकदिवसीय पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन मेळघाट कार्यालयाच्या कुलढाप सभागृहात करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी शहरातील एकूण ०७ महाविद्यालयाचे एकूण ५५ विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळे करिता उद्घाटक म्हणून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक श्री. आदर्श रेड्डी होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये मेळघाटचे विभागीय वनाधिकारी श्री. मनोज खैरनार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेक्सचे सचिव डॉ. जयंत वडतकर तसेच मंचावर कोषाध्यक्ष प्रा. डॉ गजानन वाघ, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत वऱ्हेकर व सहसचिव प्रा.डॉ. मंजुषा वाठ यांची उपस्थिती होती. कार्यशाळेचे समन्वयक किरण मोरे, सौरभ जवंजाळ, मनीष ढाकुलकर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी अरण्यम संस्थेचे. सर्वेश मराठे, युथ फॉर नेचर कंझर्व्हेशनचे पंकज बांडाबुचे, शंतनु पाटील यांची विशेष उपस्थिती होती. कार्यशाळेचे उद्घाटन दीप प्रज्वलन तथा म. गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे प्रतिमा पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेक्सचे सचिव तथा मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी केले. मातीचे गणपती बसवा निसर्गाशी बांधिलकी दाखवा हा पर्यावरण पूरक उपक्रम वेक्स हि संस्था अमरावती शहरात गेली १९ वर्षे राबवीत आहे. तसेच वन्यजीव अभ्यास, संशोधन, व जनजागृती अशा अनेक उपक्रमात संस्थेसोबत जुळलेल्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून कार्य करीत असतात. या विद्यार्थ्यांना पर्यावरण व वन्यजीव या विषयाची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने संस्था दरवर्षी या कार्यशाळेचे निशुल्क आयोजन करीत असते. पर्यावरणासाठी स्वयंसेवक बनण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे हा कार्यशाळेचा हेतू असल्याचे डॉ जयंत वडतकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. कार्यशाळेच्या उद्घाटक मेळघाटचे वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात भारतातील वन्यजीवन आणि कायदे व तसेच व्याघ्रप्रकल्पाचे यश व आवाहने व सध्याच्या विविध समस्या यावर भाष्य करून विद्यार्थ्यांना या क्षेत्रात कार्य करण्यासाठी पुढे येण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. एखाद्या कार्यासाठी संपूर्ण आयुष्य देणारी मंडळी फार मोजकी आहेत अशा ग्रीन वॉरियरला हा वेक्स तर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहात याकरिता त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले.वेक्स संस्थेने गेल्या २४ वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेऊन संस्थेची कामगिरी अतिशय भरीव असल्याचे तसेच निसर्ग, पर्यावरण व वन्यजीव याप्रती जिव्हाळा व जाणीव असलेली माणसे एकत्र येऊन काम करणारी संस्था म्हणून आज वेक्स ची वेगळी ओळख आहे असे डॉ जयंत वडतकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande