चंद्रपूर : निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांचा कॉंग्रेसवर घणाघात
चंद्रपूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।कोरपना येथील ११ वर्षीय शालेय विद्यार्थीनीवर बलात्कार करणारा आरोपी अमोल लोडे हा कोरपना शहर युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष आहे. गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासवण्याचे काम करणाऱ्या या नराधमाने मुलीसमान छोट्या विद्यार्थीं
चंद्रपूर : निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांचा कॉंग्रेसवर घणाघात... आरोपी अमोल लोडेच्या निषेधार्थ राजुरा येथे आंदोलन


चंद्रपूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।कोरपना येथील ११ वर्षीय शालेय विद्यार्थीनीवर बलात्कार करणारा आरोपी अमोल लोडे हा कोरपना शहर युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष आहे. गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासवण्याचे काम करणाऱ्या या नराधमाने मुलीसमान छोट्या विद्यार्थींवर मागील अनेक महिन्यांपासून गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केले. त्याची ही विकृती म्हणजे नीच मानसिकतेचा कळस आहे. अशा या नराधमाला त्याला पाठीशी घालणारे आणि या निर्दयी घटनेवर मूग गिळून गप्प बसलेल्या कॉंग्रेसचे स्थानिक नेते यांची करावी तेवढी निंदा कमी आहे असा घणाघात भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी केला.

कोरपना येथील इमिनेन्स इंटरनॅशनल स्कुल या शाळेतील ११ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीवर कोरपना शहर युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष असलेल्या संचालक अमोल लोडे या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ शनिवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजुरा येथे निषेध आंदोलन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

लक्षणीय महिलांच्या उपस्थितीत शहरातील भवानी माता मंदिरापासून गांधी चौक ते पोलिस ठाणे अशी भव्य निषेध रॅली काढून भाजपने आरोप अमोल लोडेचा तिव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

शहरातील चौकाचौकातून निषेध नोंदवत आलेल्या रॅलीची सांगता पोलीस ठाणे राजुरा येथे करण्यात आली असून आरोपी अमोल लोडेला फाशीची शिक्षा द्यावी तसेच त्याला मदत करणाऱ्या कॉंग्रेसी हस्तकांनाही शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने ठाणेदारांमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

या आंदोलनात माजी आमदार सुदर्शन निमकर, तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे शहराध्यक्ष सुरेश रागीट, विनायक देशमुख, यांचेसह राजुरा शहर आणि तालुक्यातून महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

----------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande