माजी आमदार सिताराम दळवींवर अंधेरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
मुंबई, 5 ऑक्टोबर (हिं.स.) - माजी आमदार सीताराम दळवी यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन. ते 82 वर्षांचे होते. संध्याकाळी 6.30 वाजता त्यांच्यावर अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा संदिप दळवी यांनी त्यांना अग्नी दिला. यावेळी जावई म
माजी आमदार सिताराम दळवींवर अंधेरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार


मुंबई, 5 ऑक्टोबर (हिं.स.) - माजी आमदार सीताराम दळवी यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन. ते 82 वर्षांचे होते. संध्याकाळी 6.30 वाजता त्यांच्यावर अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा संदिप दळवी यांनी त्यांना अग्नी दिला. यावेळी जावई मुंबई भाजपा अध्यक्ष अँड आशिष शेलार यांच्यासह खासदार रवींद्र वायकर, शिवसेना (उबाठा सेना) आमदार अनिल परब, आमदार सुनील प्रभू, माजी आमदार नितीन सरदेसाई, अमोल किर्तीकर, हाजी अराफत शेख यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक जण उपस्थित होते.

मनसे नेते संदिप दळवी यांचे ते वडिल होत. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी शिला, मुलगा संदिप, मुलगी अँड प्रतिमा आशिष शेलार, जावई अँड आशिष शेलार, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अधेरी विधानसभा मतदार संघातून 1995 ला शिवसेनेच्‍या तिकीटावर ते विजयी झालेले होते. त्‍यापुर्वी मुंबई महापालिकेत नगसेवक म्‍हणून ही विजयी झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत कामकेलेल्या निष्‍ठावान शिवसैनिका पैकी ते एक होते. शिवेसेनेच्‍या उभारतीच्‍या काळात मुंबई आणि महाराष्‍ट्रात झालेल्‍या पक्षाच्‍या अनेक आंदोलनात त्‍यांचा सहभाग होता. तसेच विविध सामाजिक संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्‍हयातील आरोस हे त्‍यांचे मुळ गाव असून त्‍यांचे मुंबईतील अंधेरी पूर्व येथे ते अखेरपर्यंत वास्‍तव्‍यास होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande