'हिजबुल्ला’ म्होरक्याच्या समर्थनार्थ जुन्नरमध्ये होर्डिंग्ज लावून मोर्चा, दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्यासह ४ पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल मुंबई, 5 ऑक्टोबर (हिं.स.) - इस्रायल आणि आतंकवादी संघटना हिजबुल्ला यांच्यात चालू असलेल्या युद्धात या संघटनेचा म्होरक्या सय्यद हसन नसरुल्ला याला इस्र
हिजबुल्ला म्होरक्याच्या समर्थनार्थ होर्डिंग्ज


- हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्यासह ४ पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल

मुंबई, 5 ऑक्टोबर (हिं.स.) - इस्रायल आणि आतंकवादी संघटना हिजबुल्ला यांच्यात चालू असलेल्या युद्धात या संघटनेचा म्होरक्या सय्यद हसन नसरुल्ला याला इस्रायलने ठार केले. हिजबुल्लाला अमेरिका आणि अन्य ६० देशांनी ‘आतंकवादी संघटना’ म्हणून घोषीत केले आहे. असे असतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत अर्थात् जुन्नर गावात (ता. जुन्नर, जिल्हा पुणे) सय्यद हसन नसरूल्ला या आतंकवाद्याला ‘मानवतेसाठी लढणारा शहिद’ असल्याचा मोठे होर्डिंग्ज लावून ३ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या पवित्र दिवशी ‘काळा दिन’ साजरा करण्यासाठी मोर्चाही काढण्यात आला. त्यामुळे शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शिवछत्रपतींच्या शिवनेरी किल्ला असलेल्या जुन्नर जन्मगावी असे देशविघातक आणि देशद्रोही कृत्य करणार्‍या मुख्य सूत्रधाराला शोधून सर्व दोषीच्या विरोधात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’ने केली आहे. या सदंर्भात महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. गृहमंत्री, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, तसेच तळेगाव, मंचर आणि कोल्हापूर शहारातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावातील सय्यदवाडा येथे काही समाजकंटकांकडून मोठे होर्डिंग्ज लावून ‘मानवतेसाठी लढा देणारे ....शहिद’ म्हणून सय्यद हसन नसरूल्ला या आतंकवाद्याचे उदात्तीकरण करण्यात आले. यात इस्त्रायल आणि अमेरिका या भारताच्या मित्र देशांना दहशतवादी म्हणून संबोधले आहे. यामध्ये जुन्नर येथे सय्यद हसन नसरूल्ला याच्या समर्थनार्थ बॅनरबाजी कोणी व का केली ?, त्यामागील सदर कृत्य करणार्‍याचा हेतु काय होता?, त्यांना अर्थपुरवठा कोठून झाला ? ३ ऑक्टोबरला दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढून घोषणाबाजी कोणी व का केली? त्याची त्यांनी रितसर पोलीस परवानगी घेतली होती का ? आदी प्रश्न हिंदु राष्ट्र समन्वय समितीने तक्रारीमध्ये उपस्थित केले आहेत.

दहशतवादी कृत्यांचे उदात्तीकरण करून भारताच्या मित्र देशांविरूध्द समाजात विष आणि द्वेष पेरण्याच्या उद्देशाने हे देशविघातक कृत्य केलेले आहे. सदर प्रकारचे कृत्य हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सानिध्याने पावन झालेल्या जुन्नर येथे केलेले असून ते महाराष्ट्र आणि देशाच्या प्रतिमेला काळीमा फासणारे आहे. सय्यद हसन नसरुल्ला या आतंकवाद्याला मानवतावादी संबोधून त्याचे उदात्तीकरण करणारे फलक लावले जातात, हे पोलीस-प्रशासनाला लज्जास्पद आहे. आता तरी पोलीस-प्रशासन याविषयी तातडीने कठोर कारवाई करावी, असेही तक्रारीत म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande