पुणे नवरात्रौ महोत्सवात कोसंबी बंधूंच्या गायनात प्रेक्षकांचा जल्लोष
पुणे, 5 ऑक्टोबर, (हिं.स.)। गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला अग अंबे गोंधळाला ये... मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून.... एकदंताय वक्रतुण्डाय गणेशाय धीमहि.... अंबाबाईचा उदो उदो अशी स्त्री शक्तीचा उदो उदो करणारी कोसंबी बंधूंनी आपल्या गायकीतू
पुणे नवरात्रौ महोत्सवात कोसंबी बंधूंच्या गायनात प्रेक्षकांचा जल्लोष


पुणे, 5 ऑक्टोबर, (हिं.स.)। गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला अग अंबे गोंधळाला ये... मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून.... एकदंताय वक्रतुण्डाय गणेशाय धीमहि.... अंबाबाईचा उदो उदो अशी स्त्री शक्तीचा उदो उदो करणारी कोसंबी बंधूंनी आपल्या गायकीतून पुणे नवरात्र महोत्सवात स्त्री शक्तीचा जागर केला. श्री गणेश, छत्रपती शिवाजी महाराज, श्री खंडेराया यांना नमन करून यांची महती सांगणारी गीतांचे सादरीकरण यावेळी केले.

‌‘पुणे नवरात्रौ महोत्सवातील आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे कोसंबी बंधू प्रस्तुत हिंदी मराठी संगीत रजनी मेलडी बीट्स कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. गायक अभिजीत कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी, श्रेया मयुराज, राधिका अत्रे व आसावरी पंचमुख यांनी सादर केलेल्या गाण्यावर लहानग्यासह ते ज्येष्ठांनी धरलेला नृत्याचा ठेका, टाळ्यांची व वन्समोरची दाद देत कार्यक्रमाला रंगत आणली. निवेदक महेश दळवी यांच्या हास्यविनोदाने व विविध किस्से तसेच सचिन तेंडुलकर यांचा आवाजपासून ते ज्येष्ठ अभिनेते परेश रावल, गोविंदा व विविध विनोदी नायकांचे हुबेहूब आवाज काढून श्रोत्यांना खळखळून हसवले. नवरात्रौ महोत्सवाच्या काळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यानिमित्तानेही या कार्यक्रमात मराठी गीतांचा जागर करण्यात आला.

श्रेया मयुराज यांनी एकदंताय वक्रतुण्डाय, गणेशाय धीमहि, चांगभलं रे ज्योतिबांच्या नावानं चांगभलं रं, या गाण्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.

काळी माती हिरवा शिवार, झुंजूर मुंजूर पाऊस माऱ्यानं, ढगांन काळ निळ आभाळ आनंदलं, हे निसर्ग गीत सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.

जीव दंगला गुंगला रंगलाअसा...राधा ही बावरी... अधीर हे मन... हे प्रेम गीत सादर करून गायकांनी श्रोत्यांची वन्समोरची दाद मिळवली. बंध जुळती हे प्रीतीचे हे प्रेम गीत सादर करण्यात आले. मला जाऊद्याना घरी आता वाजले की बारा, चंद्रा ही बहारदार लावणी सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. कजरारे, ओ लाल मेरी ही या हिंदी गीताच्या सादरीकरणाने गायकांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

सर्वप्रथम 'आई' शब्द उच्चारून मराठी भाषा आपण शिकतो. आई, माता, महिलाशक्ती यामध्ये खूप मोठी शक्ती आहे. स्त्रियांचा आपण आदर केला पाहिजे, ही शिकवण नवरात्रो महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी महोत्सवाच्या माध्यमातून देत आहेत. आईचा, महिला शक्तीचा, मराठीचा जागर महोत्सवातून अविरतपणे तीस वर्षापासून देत आहेत. नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात, असे आबांच्या कार्याचे कौतुक करून कोसंबी बंधूंनी आईचा उदो उदो करणारी गाण्यांचे सादरीकरण करून श्रोत्यांची मने जिंकली. अंबाबाईचा गोंधळ सादर करून नृत्याचा ठेका धरून दाद दिली.

कार्यक्रमाला ढोलकीवर रोशनी कुडाळकर, ऑक्टो पॅड वर सागर, कीबोर्ड वर नितीन फ्लूटवर हिमांशू बक्षी व विजय पानसरे यांनी साथसंगत केली.

पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी गायक व कलाकारांचा सत्कार केला. उद्योजक वसंत जगताप व वसंत दुर्वे यांच्यासह यावेळी महोत्सवाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande