जळगाव  : लाचखोर पोलिसासह साथीदाराला अटक
जळगाव, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामधल्या वाघळी बीट हवलदाराला दोन हजारांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. लाचखोर बीट हवालदारासह त्याचा पंटरला देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल
जळगाव  : लाचखोर पोलिसासह साथीदाराला अटक


जळगाव, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामधल्या वाघळी बीट हवलदाराला दोन हजारांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. लाचखोर बीट हवालदारासह त्याचा पंटरला देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.चाळीसगाव तालुक्यातील मौजे तरवाडे येथील तक्रारदाराचा गावातील एकाशी वाद झाला होता. समोरच्या व्यक्तीने तक्रारदाराविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात ५ सप्टेंबरला गुन्हा दाखल केला होता. नंतर वाघळी बीटचे हवलदार जयेश रामराव पवार (वय ५०, रा. गायकेनगर, हिरापूर रोड, चाळीसगाव) यांनी तक्रारदाराला त्याच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात कारवाईमध्ये सहकार्य करण्याच्या मोबदल्यात तसेच त्रास न होऊ देण्यासाठी त्यांच्याकडे चार हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. सदर पथकाने चाळीसगाव येथे सापळा रचला. हवालदार जयेश पवार यांनी तक्रारदाराकडे पंचासमक्ष ४ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता दोन हजार रुपये त्यांनी खासगी सुनील श्रावण पवार (वय ५२) यांच्या हस्ते स्वीकारताना त्यांना पकडले. संशयित जयेश पवार व सुनील पवार यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande