चोरीच्या वादातून मेंढपाळाचा खून
नाशिक, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : बागलाण तालुक्यातील नामपूरलगत टिंगरी गावातील देवसिंग लालसिंग पगारे (वय ३५) आपल्या शेळ्या-मेंढ्या जंगलात चारत असताना चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा प्रतिकार करताना त्यांचा खून करण्यात आला. ही घटना सकाळी घडली. दे
आत्महत्या लोगो


नाशिक, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : बागलाण तालुक्यातील नामपूरलगत टिंगरी गावातील देवसिंग लालसिंग पगारे (वय ३५) आपल्या शेळ्या-मेंढ्या जंगलात चारत असताना चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा प्रतिकार करताना त्यांचा खून करण्यात आला. ही घटना सकाळी घडली. देवसिंग पगारे यांच्याकडे १०० शेळ्या-मेंढ्या असून, रोज नेहमीप्रमाणे जंगलात शेळ्या- मेंढ्या चारण्यासाठी घेऊन गेले होते. टिंगरी गावात जावई म्हणून आलेला संशयित मोहन पवार ऊर्फ टकल्या अभिषेक वाघ (मूळ रा. आराई) हा शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेला असता, त्याने शेळ्या-मेंढ्यांची चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी देवसिंग पगारे यांनी त्यास विरोध केला. मात्र, पवार याने यावेळी डोक्यात दगड टाकून पगारे यांचा खून केला. घटनेचे वृत्त समजताच जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पगारे यांना नामपूर ग्रामीण रुग्णालयात नेले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. पोलिसांनी संशयित हल्लेखोर मोहन पवार व अभिषेक पवार यांना अटक केली. याबाबत फिर्याद मृताचा भाऊ शामसिंग लालसिंग पगारे याने दाखल केली. मालेगाव येथील पोलीस अधिकारी अनिकेत भारती हेसुद्धा घटनेचा तपास घेण्यासाठी दिवसभर ठाण मांडून बसले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande