नाशिक, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रथमच नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशिरपणे काळा धंदा अर्थात कोणत्याही स्वरुपाचा अवैध व्यवसाय चालविणाऱ्या व प्रत्यक्ष सहभाग असलेल्या 389 जणांवर थेट तडिपारीची कारवाई करण्यात आली आहे. शहरात प्रथमच अशा स्वरुपाची कारवाई झाली असून अवैध धंद्यांना चालना देणाऱ्यांनाच शहरातून हद्दपार करण्यात आल्याने काहींचे धाबे दणाणले आहेत. कारवाई झालेल्या राजकीय पाठबळ असलेल्याचाही संशयितांचाही समावेश आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात देखील चांगलीच खळबळ उडाली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाई केल्यानंतर आता अवैध धंदे चालविणाऱ्यांनाही पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. त्यामध्ये अवैधरित्या दारू विक्री व साठा करणारे, अमली पदार्थ, मांस विक्रेते, जुगार व इतर अवैध धंदे चालविणाऱ्यांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ही कारवाई केल्याचे पोलीसांनी म्हटले असून राजकीय नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचे पाठबळ असलेल्या संशयितांचाही ३८९ जणांमध्ये समावेश आहे. राजकीय पार्श्वभूमीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकत्यांविरुद्ध तडीपारी प्रस्तावित झाल्याची चर्चा असतानाच आता संबंधितांची अंतिम यादी तयार झाली. त्यांच्या तडीपारीचे आणि पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये, शहरातील तेरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये चुंचाळे 55 भद्रकाली 45 इंदिरानगर ४० पंचवटी 34 मसरूळ 13 आडगाव 22 मुंबई नाका 18 सरकार वाडा चार गंगापूर चार सातपूर 22 अंबड 37 उपनगर 35 नाशिक रोड 38 देवळाली कॅम्प 22 अशी संख्या असून या आदेशामध्ये म्हटले आहे की ३८९ संशयित तडीपार १६ ते २४ नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत तडीपार करण्यात आले आहे. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत मतदान करता येणार मतदान केल्यानंतर पुन्हा शहरासह जिल्ह्याबाहेर जाण्याचे आदेश दिले आहेत. चौकट प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार घेतल्यानंतर सातत्याने समाजातील विविध घटकांशी संवाद साधून वेगवेगळी माहिती गोळा करत अनेक कारवाया केल्या आहेत परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केलेली ही तडीपारीची कारवाई ही पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासामध्ये प्रथमच झाली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI