मोहोळ व कर्नाटक पोलिसांनी केले शहरातून पथसंचलन, गुन्हेगारांना भरली धडकी
सोलापूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। मोहोळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलीस व कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या वतीने मोहोळ शहरासह तालुक्यातील विविध गावातून पथसंचलन करण्यात आले. यामुळे गुन्हेगारांच्या मनात धडकी भरली. मोहोळ विधानसभा मतदारस
मोहोळ व कर्नाटक पोलिसांनी केले शहरातून पथसंचलन, गुन्हेगारांना भरली धडकी


सोलापूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।

मोहोळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलीस व कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या वतीने मोहोळ शहरासह तालुक्यातील विविध गावातून पथसंचलन करण्यात आले. यामुळे गुन्हेगारांच्या मनात धडकी भरली.

मोहोळ विधानसभा मतदारसंघ म्हणजे राज्यातील चर्चेतला मतदारसंघ. या मतदार संघातील निवडणूक निर्भय व शांततेत पार पडावी यासाठी मोहोळ पोलीस व कर्नाटकातील 75 पोलीस 5 अधिकारी यांनी शहरातील मुख्य रस्त्यासह बाजार पेठेतून तसेच नरखेड, शेटफळ, अनगर या गावात पथसंंचलन केले.

यामुळे पोलीस आपल्या पाठीशी असल्याचा सर्वसामान्यांचा विश्वास द्विगुणीत झाला. या पथसंचलनात ध्वनिक्षेपका वरून नागरिकांनी मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावावा असे आवाहन अधिकाऱ्या मार्फत करण्यात येत होते.

दरम्यान पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत म्हणाले, समाज माध्यमावर सोलापूर पोलीस दलाच्या सायबर सेल विभागाचे बारीक लक्ष आहे. समाज माध्यमावर आक्षेपार्ह व्हिडिओ, ऑडिओ, विविध संदेश व फोटो टाकू नयेत, जेणे करून समाजात तेढ निर्माण होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande