गोंदिया, 28 नोव्हेंबर (हिं.स.)।
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील भिवापूर येथे रक्ताच्या थारोळ्यात सुनील तुमडे (३२, रा. भुराटोला) यांचा मृतदेह आढळला होता. या खून प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. वैष्णवी सुरणकर व मंगेश रहांगडाले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
भिवापूर येथील नाल्याजवळ सुनील तुमडे यांचा मृतदेह आढळला होता. धारदार हत्याराने डोक्यावर वार करून त्यांचा खून करण्यात आला होता. सुनीलची आई चंद्रकला तुमडे (रा. भुराटोला) यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. यात वैष्णवी, व मंगेशने मिळून सुनीलला खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar