दापोलीत जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा
रत्नागिरी, 14 डिसेंबर, (हिं. स.) : दापोलीतील जॉली स्पोर्ट्स क्लबच्या वतीने रत्नागिरी जिल्हा मानांकनपद कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा येत्या २८ आणि २९ डिसेंबर या कालावधीत जॉली स्पोर्टस् क्लबमध्ये होईल. पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला ए
दापोलीत जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा


रत्नागिरी, 14 डिसेंबर, (हिं. स.) : दापोलीतील जॉली स्पोर्ट्स क्लबच्या वतीने रत्नागिरी जिल्हा मानांकनपद कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा येत्या २८ आणि २९ डिसेंबर या कालावधीत जॉली स्पोर्टस् क्लबमध्ये होईल.

पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, कुमार गट, कुमारी गट किशोर गट आणि किशोरी गट अशा सात गटांत स्पर्धा होणार आहे. या वर्षातील ही चौथी स्पर्धा आहे. जे खेळाडू यावर्षी कोणतीही स्पर्धा खेळलेले नाहीत, त्यांनी या वर्षाची ५० रुपये रजिस्ट्रेशन फी जिल्हा असोसिएशनकडे जमा करायची आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी पुरुष व महिला गटासाठी १५० रुपये, दुहेरीसाठी २०० रुपये व लहान गटासाठी १०० रुपये याप्रमाणे असेल. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवशक आहे. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करणात येईल.

सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित द्यावात. स्पर्धेत सामना खेळण्यासाठी खेळाडूने पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून साईप्रकाश कानिटकर व कैलास देवळेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेणाचे आवाहन जॉली स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अरुण मकरंद गांधी, सचिव श्रीराम माजलेकर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय अण्णा रेडीज आणि सचिव मिलिंद साप्ते यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande