मविआच्या खासदारांनी संसद परिसरात उंचावले फलक
नवी दिल्ली, 14 डिसेंबर (हिं.स.) : परभणीत संविधान शिल्पाच्या तोडफड प्रकरणी कसून चौकशी करावी. तसेच मागासवर्गीयांवरील अन्यायकारक कारवाई थांबवावी या मागण्यांसाठी मविआच्या खासदारांनी दिल्लीतील संसद भवन परिसरात आंदोलन केले.
परभणीत ज्या व्यक्तीने संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली त्याला कोणी चिथावणी दिली होती का, हे तपासले जावे. जेणेकरून यामागचा सुत्रधार कोण आहे हे समोर येईल, अशी मागणीही केंद्र सरकारसह राज्यातील मविआच्या खासदारांनी केली. संविधानाच्या रक्षणासाठी आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने उभे राहण्याचा निर्धार यावेळी खासदारांनी व्यक्त केला. यावेळी खासदार प्रणिती शिंदे महायुती सरकारवर टीका करत म्हणाल्या की, राज्यात भाजपची सत्ता येऊन आठवडा झाला नाही आणि महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यात अशा प्रकारची घटना घडली. परभणीमध्ये जे झाले त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. दरम्यान, या आंदोलनाला खासदार प्रणिती शिंदेंसह, वर्षा गायकवाड, विशाल पाटील, बळवंत वानखेडे, रवींद्र चव्हाण, गोवाल पाडवी, डॉ. प्रशांत पडोळे, डॉ. नामदेव किरसाण, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. शिवाजी काळगे, कल्याण काळे, अमर काळे, प्रतिभा धानोरकर, शामकुमार बर्वे आदी खासदार उपस्थित होते. -------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी