नवी दिल्ली, 26 डिसेंबर (हिं.स.)
: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7 लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी सहकुटुंबिय सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांचा मुलगा लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे उपस्थित होते.उपमुख्यमंत्री श्री. शिेंदे यांनी पंतप्रधानांना पारंपारिक पैठणी शेलु आणि पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद घेतला.
पंतप्रधानांच्या भेटीनंतर श्री. शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत, “ही भेट सदिच्छा भेट होती. तसेच, या भेटीत श्री. शिंदे विकसित भारताच्या वाटचालीत राज्याचा योगदानाबाबत श्री. मोदी यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून सर्वोत्तपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी योवळी सांगितले.
या दौ-या दरम्यान उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी श्री. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि पारंपारिक शाल भेट स्वरुपात दिली. तर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना प्रभू श्रीरामाची मूर्ती आणि पारंपारिक शाल भेट स्वरुपात दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी