राज्यातील काही भागात गारपीट,पावसाचा इशारा 
मुंबई , 26 डिसेंबर (हिं.स.)। राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. कडाक्याची थंडी गायब झाली असून त्याची जागा ढगाळ वातावरणाने घेतली आहे. आज राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उद्या राज्याती
प्लास्टिक


मुंबई , 26 डिसेंबर (हिं.स.)। राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. कडाक्याची थंडी गायब झाली असून त्याची जागा ढगाळ वातावरणाने घेतली आहे. आज राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उद्या राज्यातील अनेक भागांत पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पश्‍चिम-मध्य बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण झाले आहे. त्यामुळे थंडी गायब झाली आहे.२७ आणि २८ डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २७ डिसेंबर रोजी दुपारपासून नंदूरबार, धुळे, अहिल्यानगर, जळगाव यांसह पुणे, नाशिक जिल्ह्यांच्या पूर्व ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात रात्रीपर्यंत वादळी पावसाचा अंदाज. काही भागात गारपिटीचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता राहिल. या ठिकाणी गारपीट होईल. पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची स्थिती कायम राहिल. यानंतर रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी वगळता राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर राहिल आणि सोमवारपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी - अधिक होत आहे. बुधवारी (ता. 25) पंजाबच्या आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात ढगाळ हवामान झाले असून, गारठा कमी होत उकाडा वाढला आहे. बुधवारी (ता. 25) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी 13.4 अंश तापमान नोंदले गेले. दरम्यान शेतकऱ्यांनी या पुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash


 rajesh pande