नागपूरसाठी 26 उमेदवारांचे अर्ज वैध
नागपूर, 28 मार्च (हिं.स.) : नागपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज, गुरुवारी नामनिर्देशनपत्रांच्या छ
संग्रहित


नागपूर, 28 मार्च (हिं.स.) : नागपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज, गुरुवारी नामनिर्देशनपत्रांच्या छाननीअंती 26 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर 27 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. वैध अर्जांमध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांचे 3 उमेदवार, नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार 13 व अपक्ष 10 अशा एकूण 26 उमेदवारांचा समावेश आहे.

वैध उमेदवारांमध्ये नितीन गडकरी (भारती जनता पार्टी), योगीराज उर्फ योगेश पतीराम लांजेवार (बहुजन समाज पार्टी), विकास ठाकरे (इंडियन नॅशनल काँग्रेस), किवीनसुका सुर्यवंशी ( देश जनहित पार्टी), गरुदाद्री आनंद कुमार (अखिल भारतीय परिवार पार्टी), गुणवंत सोमकुवर ( भारतीय जवान किसान पार्टी), टेकराज बेलखोडे (बहुजन मुक्ती पार्टी), दीपक मस्के (बहुजन महा पार्टी), नारायण चौधरी (सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया कम्युनिस्ट), फहीम शमीम खान ( माइनोरिटिज डेमोक्रेटिक पार्टी), विजय मानकर (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), विशेष फुटाणे ( बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), श्रीधर साळवे (भीम सेना), सुनील वानखेडे ( राष्ट्र समर्पण पार्टी), सुरज मिश्रा ( कुणबी बहुजन स्वराज्य पार्टी), ॲड. संतोष लांजेवार (ऑल इंडिया फॅारवर्ड ब्लॅाक), आदर्श ठाकूर (अपक्ष), ॲड. उल्हास दुपारे ( अपक्ष), धानु वलथरे (अपक्ष), प्रफुल भांगे ( अपक्ष), बबिता अवस्थी (अपक्ष), विनायक अवचट (अपक्ष), सचिन वाघाडे ( अपक्ष), साहिल तुरकर(अपक्ष), सुशील पाटील (अपक्ष), संतोष चव्हान (अपक्ष) यांचा समावेश आहे. शनिवार 30 मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून आगामी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande