ठाणे जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार - छायाचित्रकारांचा होणार सन्मान
ठाणे, 29 मार्च (हिं.स.) ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने येत्या ३० मार्च रोजी ठाण्यात पत्रकार मेळा
ठाणे जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार - छायाचित्रकारांचा होणार सन्मान


ठाणे, 29 मार्च (हिं.स.) ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने येत्या ३० मार्च रोजी ठाण्यात पत्रकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार एस. रामकृष्णन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार, संपादक आणि छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि कोकण सकाळचे संपादक राजाराम माने, भिवंडी येथील कुसुमताई देशमुख,तसेच नवी मुंबई, अंबरनाथ, मीरा-भाईंदर, कल्याण येथील पत्रकारांचा सन्मान केला जाणार आहे.

ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये सकाळी साडे दहा ते बारा वाजण्याच्या सुमारास सर्वसाधारण सभा संपन्न होणार आहे. दुपारी १२ वाजता पत्रकारांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात जीवनगौरव पुरस्कारासह मान्यवर गौरवमूर्तीचा सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी शिनगारे यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, किरण नाईक हे विशेष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ठाणे शहरासह जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित राहावे. असे आवाहन ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या सत्कारमूर्ती मध्ये ठाणे - राजाराम माने, नवी मुंबई - विश्वरथ नायर, कल्याण : नाना पिसाट , शहापूर:- प्रकाश परांजपे, भिवंडी :- श्रीमती कुसुमताई देशमुख , मुरबाड- . सुधीर पोतदार , अंबरनाथ- पांडुरंग रानडे,

मीरा- भाईंदर-अनिल खेडेकर,

छायाचित्रकार दीपक जोशी, कॅमेरामन अशोक गुप्ता आणि मुक्त पत्रकार प्रशांत सिनकर तसेच , पत्रकार कल्याण निधी समिती सदस्य संपादक कैलाश म्हापदी व आरोग्य समितीवर निवड झालेले पत्रकार कविराज चव्हाण यांचाही या मेळाव्यात सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्य अधिस्वीकृतीवरी सदस्य दिलीप सपाटे, विनोद जगदाळे,जयेश सामंत आणि संजय पितळे, कोकण विभागाचे मनोज जालनावाला तसेच मुंबई विभागातील विभव बिरवटकर यांचाही या मेळाव्यात सत्कार करण्यात येणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande