गुजरात : भीषण अपघात10 जणांचा मृत्यू
नडियाद, 17 एप्रिल (हि.स.) : अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेस हायवेवरील नडियादजवळ आज, बुधवारी झालेल्या भीषण
भीषण अपघात10 जणांचा मृत्यू


नडियाद, 17 एप्रिल (हि.स.) : अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेस हायवेवरील नडियादजवळ आज, बुधवारी झालेल्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. एक्स्प्रेस वेवर टँकरच्या मागून भरधाव वेगाने येणारी कार थेट टँकरच्या मागून धडकल्यामुळे हा अपघात झाला.

अपघातग्रस्त कार वडोदराहून अहमदाबादला जात होती. नडियादजवळ भरधाव वेगाने कार पुढे जाणाऱ्या टँकरला धडकली. यानंतर संपूर्ण महामार्गावर अपघातग्रस्तांच्या किंकाळ्या निनादत होत्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ते महामार्गाजवळ होते, तेव्हा त्यांना मोठा आवाज आला आणि सर्वजण घटनास्थळी पोहोचले. येथे एका टँकरच्या मागून कार धडकली. कसेबसे क्रेन बोलावून गाडी बाहेर काढण्यात आली. कारमधून 10 जणांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्याकडे ढळून आलेल्या आधारकार्डवरून मृतांची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande