अयोध्येतील राममूर्तीला सूर्यकिरणांचा अभिषेक
अयोध्या, 17 एप्रिल (हिं.स.) : अयोध्येत रामनवमीच्या निमित्ताने राम मंदिरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आल
अयोध्येतील राममूर्तीला सूर्यकिरणांचा अभिषेक


अयोध्या, 17 एप्रिल (हिं.स.) : अयोध्येत रामनवमीच्या निमित्ताने राम मंदिरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिरात पहाटेपासून पूजा-अर्चना सुरू होती. तर दुपारी 12 वाजता राम जन्माच्या वेळी मूर्तीच्या कपाळाला सूर्यकिरणांनी अभिषेक करण्यात आला.

विज्ञानाचा वापर करून, प्रंदीर व्यवस्थापनाने 5.8 सेमी प्रकाशाच्या किरणासह रामललाचे 'सूर्य टिळक' केले आहे. यावेळी 10 भारतीय शास्त्रज्ञांची टीम राम मंदिरात तैनात करण्यात आली होती. दुपारी 12 वाजून 3 ते 3.5 मिनिटांपर्यंत आरसा आणि लेन्सचा वापर करून रामललाच्या मूर्तीच्या कपाळावर सूर्यप्रकाश अचूकपणे लावण्यात आला. शास्त्रज्ञांच्या चमूने यासाठी अथक परिश्रम घेतलेत. शास्त्रज्ञांनी आरसे आणि लेन्सचा समावेश असलेले उपकरण तयार केले होते. ऑप्टो-मेकॅनिकल सिस्टीममध्ये 4 आरसे आणि 4 लेन्स असतात जे पाइपिंग सिस्टीमच्या आत बसवलेले असतात. वरच्या मजल्यावर छिद्र असलेले संपूर्ण आवरण ठेवलेले असते. आरसा आणि लेन्सच्या माध्यमातून सूर्यकिरण गर्भगृहात पोहोचवून मूर्तीकडे वळवले जातात. शेवटची लेन्स आणि आरसा पूर्वेकडे तोंड करून श्रीराम मूर्तीच्या कपाळावर सूर्याची किरणे केंद्रित करतात. दरवर्षी रामनवमीच्या मुहूर्तावर सूर्याची किरणे उत्तरेकडे दुसऱ्या आरशाकडे पाठवून सूर्य टिळक तयार केला जातो. पाइपिंग आणि इतर भाग तयार करण्यासाठी पितळ धातू वापरला जातो. यासाठी वापरण्यात येणारा आरसा आणि लेन्सची गुणवत्ता उच्च असते. त्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात. तसेच पाईपची आतील पृष्ठभाग काळ्या पावडरने रंगविली जाते, ज्यामुळे सूर्यप्रकाश विखुरला जात नाही. सूर्याच्या उष्णतेच्या लहरी मूर्तीच्या कपाळावर पडू नयेत म्हणून इन्फ्रारेड फिल्टर ग्लास वापरला जातो.

अयोध्येत सूर्यकिरणांच्या अभिषेकाचा प्रयोग करण्यासाठी बनवलेल्या टीममध्ये रुरकी येथील सीबीआरआय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्स (आयआयएपी) इथल्या शास्त्रज्ञांचा समावेश होता. शास्त्रज्ञांच्या या चमूने सौर ट्रॅकिंगच्या स्थापित तत्त्वांचा वापर करून मंदिराच्या तिसऱ्या मजल्यापासून गर्भगृहापर्यंत सूर्यकिरणांचे अचूक संरेखन व्यवस्थापित केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स आणि बेंगळुरूस्थित कंपनी ऑप्टिका यांच्या तांत्रिक सहाय्याने संपूर्ण प्रक्रियेत मदत केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande