पंतप्रधानांनी केले श्रीरामांचे ऑनलाईन दर्शन
नलबारी (आसाम) , 17 एप्रिल (हिं.स.) : अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर आज, बुधवारी पहिलीच रामनवमी स
पंतप्रधानांनी केले श्रीरामांचे ऑनलाईन दर्शन


नलबारी (आसाम) , 17 एप्रिल (हिं.स.) : अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर आज, बुधवारी पहिलीच रामनवमी साजरी करण्यात आली. यावेळी रामललाचा 'सूर्यतिलक' रामाच्या पूजा-अर्चनेतील केंद्रबिंदू ठरला ठरला. या ऐतिहासीक क्षणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन दर्शन घेतले. याबाबत त्यांनी सोशल मिडीयात पोस्ट करत माहिती दिलीय.

अयोध्येतील श्रीराम मंदिरात दुपारी 12 वाजता रामललाचे सूर्य तिलक करण्यात आले. खास तंत्रज्ञानाच्या मदतीने सूर्यकिरणे रामललाच्या कपाळाच्या मधोमध पडल्याचे दिसून आले. राम मंदिरात जेव्हा रामललाचा सूर्य तिलक सोहळा सुरू असताना पंतप्रधान आसामच्या नलबारी येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते. पण जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर लगेचच पीएम मोदींनी त्यांच्या टॅबमध्ये अयोध्येतील रामललाचे अद्भुत क्षण पाहिले. खुद्द पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती आणि फोटो शेअर केला आहे.

मोदींनी त्यांच्या टॅबमध्ये रामललाचे दर्शन घेतले आणि त्यांना नमस्कार केला. पीएम मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'नलबारी सभेनंतर मला अयोध्येत रामललाच्या सूर्य टिळकांचा अद्भुत आणि अनोखा क्षण पाहण्याचे भाग्य मिळाले. श्री रामजन्मभूमीचा हा बहुप्रतिक्षित क्षण सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. हे सूर्य टिळक विकसित भारताच्या प्रत्येक संकल्पाला आपल्या दैवी उर्जेने अशा प्रकारे उजळून टाकतील' असे मोदींनी आपल्या संदेशात नमूद केलेय.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande