उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंत, अनिल देसाई यांना दिले एबी फाॅर्म
मुंबई, 17 एप्रिल (हिं.स.) - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभा निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार
ठाकरे गट


ठाकरे गट


मुंबई, 17 एप्रिल (हिं.स.) - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभा निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबई आणि अनिल देसाई यांना दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी पक्षातर्फे एबी फॉर्म दिले. याप्रसंगी रामनवमीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंना प्रभू श्रीरामाची मूर्ती देण्यात आली. आम्ही गिरगावकर संस्थेचे गौरव सागवेकर आणि शिल्पा नायक या प्रसंगी उपस्थित होते.

यावेळी दक्षिण मुंबईतील सर्व पदाधिकारी माजी आमदार दगडू दादा सकपाळ, माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, माजी आमदार अरविंद नेरकर, विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर, लोकसभा समन्वयक सुधीर साळवी, विधानसभा गटनेते आमदार अजय चौधरी, महिला विभाग संघटक माजी महापौर श्रद्धा जाधव, सुगंधा साळेकर आदी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande