मध्य रेल्वेच्या १२ अनारक्षित उन्हाळी विशेष ट्रेन सेवा
मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून आणि प्रवाशांची अतिरिक
मध्य रेल्वेच्या १२ अनारक्षित उन्हाळी विशेष ट्रेन सेवा


मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दादर-गोरखपुर , लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-दानापुर दरम्यान अतिरिक्त अनारक्षित उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

दादर-गोरखपुर अनारक्षित विशेष (६ फेऱ्या)

01015 अनारक्षित विशेष दि. २७.०४.२०२४, दि. ०१.०५.२०२४ आणि दि. ०४.०५.२०२४ रोजी दादर येथून २३.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०९.३० वाजता गोरखपुर येथे पोहोचेल. (३ फेऱ्या)

01016 अनारक्षित विशेष गोरखपुर येथून दि. २९.०४.२०२४, दि. ०३.०५.२०२४ आणि दि. ०६.०५.२०२४ रोजी १५.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ००.२५ वाजता दादर येथे पोहोचेल. (३ फेऱ्या)

थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती.

संरचना : १० शयनयान, २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह ८ द्वितीय सामान्य श्रेणी. (१८ डब्बे)

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपुर अनारक्षित विशेष (४ फेऱ्या)

01427 अनारक्षित विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई दि. २६.०४.२०२४ आणि दि. ०१.०५.२०२४ रोजी २३.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०९.३० वाजता गोरखपुर येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)

01428 अनारक्षित विशेष गोरखपूर दि. २८.०४.२०२४ आणि दि. ०३.०५.२०२४ रोजी १५.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ००.२५ वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)

थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उराई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती.

संरचना : ७ शयनयान, २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह १५ सामान्य द्वितीय श्रेणी. (२२ डब्बे)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-दानापुर अनारक्षित विशेष (२ फेऱ्या)

01051 अनारक्षित विशेष दि. २८.०४.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २३.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ११.०० वाजता दानापुर येथे पोहोचेल. (१ फेरी)

01052 अनारक्षित विशेष गाडी दि. ३०.०४.२०२४ रोजी १३.३० वाजता दानापुर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुसऱ्या दिवशी १७.०० वाजता पोहोचेल. (१ फेरी)

थांबे : दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.

संरचना : १० शयनयान, १२ द्वितीय सामान्य श्रेणी २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह. (२२ डब्बे)

प्रवाशांना विनंती आहे की वरील सर्व गाड्या अनारक्षित म्हणून चालवण्यात येतील आणि अतिजलद मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह यूटीएस प्रणालीद्वारे बुक केल्या जातील.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande