मुंबई-गोरखपुर दरम्यान २८ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या
मुंबई, २५ एप्रिल (हिं.स.) : रेल्वेने उन्हाळी हंगामात मुंबई ते उत्तरेकडे जाणाऱ्या अधिक गाड्यांची प्रच
मुंबई-गोरखपुर दरम्यान २८ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या


मुंबई, २५ एप्रिल (हिं.स.) : रेल्वेने उन्हाळी हंगामात मुंबई ते उत्तरेकडे जाणाऱ्या अधिक गाड्यांची प्रचंड मागणी लक्षात घेऊन व प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मुंबई आणि गोरखपुर दरम्यान २८ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

*गोरखपुर-लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर विशेष (२८ फेऱ्या)*

05325 विशेष गाडी दि. २६.४.२०२४ ते दि. १०.०५.२०२४ (२७.४.२०२४ वगळता) दररोज २१.१५ वाजता गोरखपुर येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०७.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. (१४ सहली)

05326 विशेष दि. २८.०४.२०२४ ते दि. १२.०५.२०२४ (दि. २९.०४.२०२४ वगळता) दररोज १०.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.०० वाजता गोरखपुर येथे पोहोचेल. (१४ फेऱ्या)

थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनौ, बाराबंकी, गोंडा, मनकापुर, बस्ती आणि खलीलाबाद

संरचना: २ वातानुकूलित-तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह. (२० डब्बे)

आरक्षण: सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर दि. २५.०४.२०२४ रोजी विशेष शुल्कासह विशेष ट्रेन क्रमांक 05326 चे बुकिंग सुरू होईल.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande