पुणे : संविधान हाच खरा राष्ट्रग्रंथ - अरविंद शिंदे
पुणे, 25 एप्रिल, (हिं.स.) : भारताच्या संविधानाने गेली 75 वर्ष भारतात लोकशाही आणि धर्म निरपेक्षता टिक
पुणे : संविधान हाच खरा राष्ट्रग्रंथ - अरविंद शिंदे


पुणे, 25 एप्रिल, (हिं.स.) : भारताच्या संविधानाने गेली 75 वर्ष भारतात लोकशाही आणि धर्म निरपेक्षता टिकवून ठेवली आहे. त्यामुळे भारताचे संविधान हाच खरा राष्ट्रग्रंथ असून त्याच्या पुढे कोणताही ग्रंथ नाही आणि हाच राष्ट्रग्रंथ व घटना बदलण्याचे षडयंत्र आगामी काळात सत्तेच्या जोरावर भाजप करू पाहत आहे. हे भाजपाचे कटू कारस्थान संविधान प्रेमी नागरिकांनी हाणून पाडल पाहिजे व येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी, इंडिया फ्रंटच्या अधिकृत उमेदवार यांना भरघोस मतदान करून भाजपाचा पराभव घडविला पाहिजे, असे मत पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी व्यक्त केले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आज काँग्रेस भवन शिवाजीनगर नगर येथे महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे पुणे लोकसभा उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ नियोजनासाठी अनुसूचित विभागाच्या पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी पुणे शहरातील विविध भागात कॉर्नर बैठका, संविधान बचाव फेरी या माध्यमातून तसेच घरोघरी जाऊन रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करण्याचे या बैठकीत ठरले.

या वेळी काही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शहर अनुसूचित जाती विभाग अंतर्गत व भवानी ब्लॉक अंतर्गत शहराध्यक्ष अरविंद शिंदे व उपस्थित प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. या बैठकीचे आभार प्रदर्शन अमर मंडलिक यांनी केले. तर, सदर बैठकीचे आयोजन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष तथा भवानी ब्लॉकचे अध्यक्ष सुजित यादव यांनी केले होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande