उपराष्ट्रपती शुक्रवारी तिरुपती आणि हैदराबाद भेटीवर
नवी दिल्ली, 25 एप्रिल (हिं.स.) - उपराष्ट्रपती जगदीप धनखड 26 एप्रिल रोजी आंध्र प्रदेशात तिरुपती आणि
उपराष्ट्रपती शुक्रवारी तिरुपती आणि हैदराबाद भेटीवर


नवी दिल्ली, 25 एप्रिल (हिं.स.) - उपराष्ट्रपती जगदीप धनखड 26 एप्रिल रोजी आंध्र प्रदेशात तिरुपती आणि तेलंगणातील हैदराबादला भेट देणार आहेत.

उपराष्ट्रपती तिरुमला, तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना करून आणि दर्शन घेऊन आंध्र प्रदेश दौऱ्याचा आरंभ करतील. तिरुपती येथील राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणूनही ते उपस्थित राहणार आहेत.

एक दिवसाच्या या दौऱ्यादरम्यान, उपराष्ट्रपती तेलंगणातील हैदराबाद येथील भारत बायोटेक सुविधेला भेट देणार आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande