मध्य रेल्वेच्या एलटीटी ते थिवि, दानापूर मार्गांवर ३८ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन
मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात
मध्य रेल्वेच्या एलटीटी ते थिवि, दानापूर मार्गांवर ३८ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन


मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन ३८ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई आणि थिवि दरम्यान ३६ त्रिसाप्ताहिक वातानुकूलित विशेष गाड्या.

लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई आणि दानापुर दरम्यान २ विशेष गाड्या.

तपशील खालीलप्रमाणे आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस-थिवि-लोकमान्य टिळक टर्मिनस त्रि-साप्ताहिक वातानुकूलित विशेष (३६ फेऱ्या)

01017 वातानुकूलित विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून दि. २६.०४.२०२४ ते ०४.०६.२०२४ पर्यंत दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी २२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०९.५० वाजता थिवि येथे पोहोचेल. (१८ फेऱ्या)

01018 वातानुकूलित विशेष थिवि येथून दि. २७.०४.२०२४ ते दि. ०५.०६.२०२४ पर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी १६.३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. (१८ फेऱ्या)

थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

संरचना : १५ वातानुकूलित -तृतीय आणि २ जनरेटर कार. (१७ डब्बे)

लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापुर विशेष (२ फेऱ्या)

01011 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून शुक्रवार, दि. २६.०४.२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १९.०० वाजता दानापुर येथे पोहोचेल.

01012 विशेष दानापुर येथून शनिवारी, दि. २७.०४.२०२४ रोजी २२.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी आणि पं. दीनदयाल उपाध्याय जं.

संरचना : दोन वातानुकूलित द्वितीय कम वातानुकूलित-तृतीय, तीन वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ६ जनरल सेकंड क्लाससह २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. (१९ डब्बे).

तिकीट बुकिंगसाठी जवळच्या संगणकीकृत आरक्षण केंद्रांना किंवा www.irctc.co.in या संकेतस्थळावर भेट द्या.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande