हिंगोली लोकसभा मतदार संघात 19 आदर्श मतदान केंद्र
हिंगोली, 25 एप्रिल (हिं.स.) : लोकसभा निवडणुकीसाठी उद्या शुक्रवार, दिनांक 26 एप्रिल, 2024 रोजी सकाळी
हिंगोली लोकसभा मतदार संघात 19 आदर्श मतदान केंद्र


हिंगोली, 25 एप्रिल (हिं.स.) : लोकसभा निवडणुकीसाठी उद्या शुक्रवार, दिनांक 26 एप्रिल, 2024 रोजी सकाळी 7 ते 6 पर्यत मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून हिंगोली लोकसभा मतदार संघात महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र- 7, दिव्यांग कर्मचारी संचलित 6 व युवा मतदान केंद्र-6 असे एकूण 19 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर दिली आहे.

या सर्व मतदान केंद्रावर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सावलीसाठी शामियाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची सुविधा, व्हील चेअर, दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा जसे प्रथमोपचार, कुबड्या, सक्षम ॲपद्वारे दिव्यांग मतदारांना ने-आण यासह आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. लोकशाहीला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी आपले अमूल्य असे मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महिला कर्मचारीद्वारे संचालित सखी आदर्श मतदान केंद्र

हिंगोली लोकसभा मतदार संघातील उमरखेड, हदगाव, वसमत, कळमनुरी व हिंगोली येथील प्रत्येक विधासभा मतदार संघनिहाय एक व किनवट विधानसभा मतदार संघात 2 याप्रमाणे महिला कर्मचारीद्वारे संचालित 7 सखी आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

82-उमरखेड विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 202-नगर परिषद कर विभाग रुम, उमरखेड, 83-किनवट विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 215-महात्मा ज्योतीबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा दक्षिण बाजू, गोकुंदा व मतदान केंद्र क्र. 24-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माहूर पूर्व बाजू, 84-हदगाव विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 108-विवेकानंद हायस्कूल हदगाव वर्ग पहिला (सी), 92-वसमत विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 190-बर्हिजी स्मारक विद्यालय गिरगाव पूर्व विंग रुम नं. 2 येथे, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 80-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन इमारत, कळमनुरी रुम नं. 2 येथे आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 286-सिटी क्लब हिंगोली खोली क्र. 1 येथे महिला कर्मचारीद्वारे संचालित 7 सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.

दिव्यांग कर्मचारीद्वारे संचालित आदर्श मतदान केंद्र

हिंगोली लोकसभा मतदार संघात प्रत्येक विधासभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे दिव्यांग कर्मचारीद्वारे संचालित 6 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

82-उमरखेड विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 206-नगर परिषद ऊर्दू प्राथमिक शाळा इमारत (पूर्व बाजू) एन.पी. गार्डन दक्षिण बाजू खोली क्र.1 उमरखेड, 83-किनवट विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 218-महात्मा ज्योतीबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा पश्चिम बाजू, गोकुंदा, 84-हदगाव विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 82-जिल्हा परिषद हायस्कूल हदगाव वर्ग 7 वा (ए), 92-वसमत विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 252-बर्हिजी स्मारक विद्यालय वसमत येथे, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 73-गुलाम नबी आझाद हायस्कूल कळमनुरी खोली क्र. 1 येथे आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 307-माणिक स्मारक आर्य विद्यालय हिंगोली खोली क्र. 1 येथे दिव्यांग कर्मचारीद्वारे संचालित 6 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.

आदर्श युवा मतदान केंद्र

हिंगोली लोकसभा मतदार संघात प्रत्येक विधासभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे 6 आदर्श युवा मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

82-उमरखेड विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 215-साकले विद्यालय लोकमान्य टिळक हॉल उमरखेड येथे, 83-किनवट विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 25-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माहूर पूर्वेस बाजू जवळ, 84-हदगाव विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 59-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठा (जे), 92-वसमत विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 229-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बौद्धवाडा नवीन इमारत पूर्व विभाग खोली क्र. 4 वसमत येथे, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 180-जिल्हा परिषद मुलींची प्राथमिक शाळा औंढा नागनाथ खोली क्र. 3 येथे आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 271-आदर्श महाविद्यालय हिंगोली खोली क्र. 1 येथे अशाप्रकारे 6 आदर्श युवा मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande