अहमदनगर : डॉ. पठारेंचा आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग
अहमदनगर, 27 एप्रिल (हिं.स.):- अहमदनगर येथील बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी सामाजकार्य व संशोधन संस्थेचे
समाजविकासा साठी सामाजिक कार्यकत्र्यांनी विविधतेचा आदर करून कृती कार्यक्रम राबवावा


अहमदनगर, 27 एप्रिल (हिं.स.):- अहमदनगर येथील बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी सामाजकार्य व संशोधन संस्थेचे संचालक डॉ.सुरेश पठारे यांना पनामा येथे पार पडलेल्या समाजकार्य व सामाजिक विकास या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होवून भूमिका मांडण्याची संधी मिळाली.५६ देशातील दीड हजाराहून अधिक सहभागी झालेल्या प्रतिनिधीमध्ये इंटरनॅशनल कौन्सिल फॉर सोशल वेलफेअर या संस्थेमधून दक्षिण आशिया खंडातून प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान डॉ.पठारे यांना मिळाला.समाजविकासा साठी सामाजिक कार्यकत्र्यांनी विविधतेचा आदर करून कृती कार्यक्रम राबवावा,अशी भूमिका डॉ.पठारे यांनी या परिषदेत मांडली.

या परिषदेत जगभरातील समाजकार्य क्षेत्रातील तज्ञ,अभ्यासक,संशोधक आणि धोरणकर्त्यांना समाजकार्य आणि सामाजिक विकास या विषयांवर विचारमंथन करण्यासाठी तसेच ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि जगभरातील गंभीर सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी धोरणे विकसित करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले.सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर महत्वपूर्ण प्रश्नांवर धोरणात्मक निर्णयांवर प्रभाव टाकण्यासाठी या परिषदे मध्ये सखोल विचारमंथन करण्यात आले.अनेक संशोधकांनी आपले संशोधन लेख या ठिकाणी सादर केले.बदलत्या सामाजिक परिस्थितीला अनुसरून सामाजिक प्रश्न हाताळ ण्यासाठी समाजकार्य पद्धती अधिक व्यापक करणे गरजेचे असल्याचे अनेकांनी मत प्रदर्शित केले.जागतिक स्तरावरील संकटे व आव्हानाचा सामना करण्यासाठी समाजातील नागरी समूहाचा व स्वयंसेवी संस्थांच्या सहभाग वाढ विणे आवश्यक असल्याचा सूर या परिषेदेतील प्रतिनिधींचा होता.डॉ.सुरेश पठारे यांनी या जागतिक परिषदेत आपली भूमिका सादर करत जागतिक असमतोल निर्मूलन आणि सामाजिक न्याय वाढवण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रभावी कार्यक्रम राबविण्याची नितांत गरज आहे यावर भाष्य केले.सामाजिक विकास साध्य करण्यासाठी विविधेचा सन्मान व आदर करून समाजातील व्यापक स्वरुपात असलेली असमानता दूर करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली.डॉ.पठारे यांनी समुदायाच्या विकासासाठी सामूहिक कृतीचा वारसा अधोरेखित केला.विविधता आणि एकता कमी करणाऱ्या विचारसरणीच्या अतिक्रमणाचा प्रतिकार करण्याची भूमिका यावर जोर दिला.यावेळी जगभरातील वंचित समाजाला भेडसावणाऱ्या बहुआयामी आव्हानांना तोंड देण्यासाठी या परिषेदेत सहभागी झालेले विविध देशांचे प्रतिनिधी नाविन्यपूर्ण धोरणे आणि दृष्टिकोन शोधण्यासाठी प्रयत्न करतील. तसेच या परिषदेद्वारे मूर्त स्वरूपातील सर्वसमावेशकता आणि विविधतेचा आदर ही परिवर्तनात्मक बदलासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल,समुदायांना अधिक न्याय्य आणि शाश्वत भविष्याच्या दिशेने प्रवास सुरू करण्यासाठी सक्षम करेल असा आशावाद डॉ.सुरेश पठारे यांनी व्यक्त केला.डॉ.सुरेश पठारे यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेतील सहभागबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांचा सहभाग भारतातील समाजकार्य शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानास्पद असून भारतातील सामाजिक असमानता दूर करण्यासाठी तसेच सर्वसमावेशक विकासाला चालना देणारी धोरणे आणि उपक्रमांना आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल असा विश्वास समाजकार्य क्षेत्रातील अनेकांनी व्यक्त केला.संस्थेचे प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यावेळी त्यांचे अभिनंदन करत सीएसआरडी संस्थेसाठी हि गौरवाची बाब असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande