रत्नागिरी : तेजस, वंदे भारत एक्स्प्रेसचे रेल्वे आरक्षण खुले
रत्नागिरी, 27 एप्रिल, (हिं. स.) : पावसाळी वेळापत्रकात वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस या कोकण रेल्वेवर
संग्रहित


रत्नागिरी, 27 एप्रिल, (हिं. स.) : पावसाळी वेळापत्रकात वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस या कोकण रेल्वेवरील गाड्यांचे आरक्षण खुले करण्यात आले आहे.

कोकणातील अनेक लोक मुंबईत स्थायिक झाले आहेत. कोकणातील लोक उन्हाळी सुट्ट्यांपासून गणपतीपर्यंत म्हणजे सप्टेंबरपर्यंत गावी येत-जात असतात. या काळात कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. यामुळे कोकणातील लोकांना सहज आरक्षण मिळत नाही. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावार दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडत असतात. यामुळे या मार्गावर अनेक गाड्या रद्द केल्या जातात. येत्या 10 जूननंतरची कोकणात जाणारी वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस गाड्यांचे आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरील आरक्षण बंद होते. यामुळे या गाड्या पावसाळ्यात बंद राहण्याच्या शक्यतेने कोकण अन् गोव्यात जाणारे लोक संभ्रात पडले होते. आता या गाड्यांचे आरक्षण खुले झाले आहे.

कोकण रेल्वे पावसाळ्यात दरडीचा धोका लक्षात घेऊन १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक लागू करते. तसेच रेल्वेचे आरक्षण प्रवासाच्या १२० दिवस आधी सुरू होत असते. कोकणाकडे जाणाऱ्या तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेसचे रेल्वे आरक्षण अखेर खुले झाले नव्हते. आता हे आरक्षण शुक्रवारपासून सुरू झाले आहे. यामुळे तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या पावसाळ्यात सुरू राहणार आहे. यामुळे यासंदर्भात निर्माण झालेला गोंधळ दूर झाला आहे. पावसाळी वेळापत्रकात कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस धावणार आहे. मध्य आणि कोकण रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर १० जून नंतरच्या या दोन रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरू करण्यात आले आहे. यामुळे गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande