नेपाळ विमान दुर्घटनेत अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
काठमांडू, २४ जुलै (हिं.स.) : नेपाळमधील काठमांडू येथे सौर्य एअर लाईन्सच्या विमान अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला, यात एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी सकाळी टेक ऑफ केल्यानंतर विमान धावपट्टीजवळच कोसळले आणि त्याला आग लाग
काठमांडू विमान दुर्घटना


काठमांडू, २४ जुलै (हिं.स.) : नेपाळमधील काठमांडू येथे सौर्य एअर लाईन्सच्या विमान अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला, यात एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येत आहे.

बुधवारी सकाळी टेक ऑफ केल्यानंतर विमान धावपट्टीजवळच कोसळले आणि त्याला आग लागली. या दुर्घटनेत क्रु मेंबर मनुराज शर्मा, त्यांची पत्नी प्रिजा खतिवाडा आणि चार वर्षीय मुलगा अधिराज शर्मा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमानात एकूण १९ प्रवासी होते, त्यातील १७ जण सौर्य एअर लाईन्सचे कर्मचारी होते. पायलट कॅप्टन एम.आर. शाक्य एकटेच वाचले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विमान, बम्बार्डियर CRJ-200ER, २०२३ मध्ये बनविलेले होते आणि दुरुस्तीसाठी पोखरा येथे जात होते. नेपाळच्या डोंगराळ भागातील प्रतिकूल हवामान, जुनी विमाने, आणि पायाभूत सुविधांची कमतरता यामुळे वारंवार अपघात होतात. नेपाळमध्ये गेल्या ३० वर्षांत २८ विमान दुर्घटना झाल्या आहेत. वर्ष २०२३ ची सुरुवातही एका विमान अपघाताने झाली होती, ज्यात ६८ जणांचा मृत्यू झाला होता. नेपाळमधील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे विमान सुरक्षा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao / सुधांशू जोशी


 rajesh pande