बांगलादेशमध्ये भीषण बॉम्ब स्फोट ; एकाचा मृत्यू
ढाका, 24 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. वृत्तानुसार, बुधवारी बांगलादेशची राजधानी ढाका येथे भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात सियाम नावाच्या एका युवकाचा मृत्यू झाला असून, तो
बांगलादेशमध्ये भीषण बॉम्ब स्फोट ; एकाचा मृत्यू


ढाका, 24 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. वृत्तानुसार, बुधवारी बांगलादेशची राजधानी ढाका येथे भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात सियाम नावाच्या एका युवकाचा मृत्यू झाला असून, तो एका खासगी कारखान्यात काम करत होता.या स्फोटात आणखी अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.

हा स्फोट बुधवारी 24 डिसेंबर रोजी संध्याकाळी ढाकामधील मोगबाजार येथील स्वातंत्र्यसैनिक स्मारकासमोर, फ्लायओव्हरखाली झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, फ्लायओव्हरच्या वरून बॉम्ब खाली फेकण्यात आला होता.या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)चे नेते तारिक रहमान यांच्या देशात परतण्याच्या एक दिवस आधी ही गंभीर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची नाकाबंदी करण्यात आली. मात्र, बॉम्ब फेकल्यानंतर उपद्रवी तात्काळ घटनास्थळावरून फरार झाले होते. ढाका महानगर पोलीस अंतर्गत रामना विभागाचे उप पोलीस आयुक्त मसूद आलम यांनी सांगितले की, या बॉम्बस्फोटामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande