मी राजकारण करण्यासाठी आलो नाही - अमित ठाकरे
अकोला, 1 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सूपूत्र अमित ठाकरे यांनी मृतक जय मालोकार यांच्या कुटूंबियांची गुरुवारी भेट घेतली. अकोल्यात आज दुपारी पोहचल्यानंतर ते निंबी मालोकारकडे रवाना झाले होते. मागील तीन दिवसापा
H


अकोला, 1 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सूपूत्र अमित ठाकरे यांनी मृतक जय मालोकार यांच्या कुटूंबियांची गुरुवारी भेट घेतली. अकोल्यात आज दुपारी पोहचल्यानंतर ते निंबी मालोकारकडे रवाना झाले होते.

मागील तीन दिवसापासून अकोल्यात राष्ट्रवादी व मनसे असा वाद चांगलाच पेटला आहे. दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना मालोकार कुटूंबाची भेट घेण्याचे आवाहन केले होते. दरम्यान गुरुवारी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी पक्षाचे दौरे रद्द करीत अकोलाकडे धाव घेतली. त्यांनी अकोला येथे दुपारी पोहचून मनसे पदाधिकाऱ्यांसोबत आधी चर्चा केली. त्यानंतर मृतक मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांच्या गावी निंबी मालोकार येथे सांत्वनपर भेट घेतली. श्रीकृष्ण मालोकार (जयचे वडील) यांच्यासह कुटूंबियांशी भेट घेत धीर दिला. यावेळी मालोकार यांच्या कुटूंबातील सदस्यांसह अकोला जिल्हा मनसे जिल्हाध्यक्ष राजेश काळे, पंकज साबळे, विजय मालोकार, सौरभ भगत, सतीष फाले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अमित ठाकरे यांनी अकोला दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलायचे टाळले. मात्र माध्यमांनी त्यांना निंबी मालोकार येथे गाठून दोन दिवसातील घडामोडीवर प्रश्न विचारले. तेव्हा त्यांनी खुली प्रतिक्रिया द्यायला नकार देत मी येथे राजकारण करायला आलो नसून माझ्या कार्यकर्त्याच्या कुटूंबीयांच्या भेटीला आलो आहे. त्यांचे दुःख मी माझे समजतो. भविष्यात नक्कीच बोलेल अशी प्रतिक्रिया दिली.

मनसे आमच्या पाठीशी - विजय मालोकार

अमित ठाकरे यांनी भेट घेतली. मनसे पदाधिकारी आमच्या पाठीशी आहे याचे समाधान आहे. माझ्या भावाच्या मृत्यूची चौकशी केली जाईल. स्वतः लक्ष घालून दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल असे आश्वासन अमित ठाकरे यांनी दिल्याचे जयचा भाऊ विजय मालोकार यांनी सांगितले. तर जय मालोकार यांची जिल्हाध्यक्ष बनण्याची इच्छा होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही विजयला स्थायी स्वरुपात जिल्हाध्यक्ष बनवू असेही सांगितले. तसेच त्यांनी आर्थीक मदत केली असेही त्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे / सुधांशू जोशी


 rajesh pande