अमरावती 1 ऑगस्ट (हिं.स.)
भाजपच्या मनुवादी विचाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कडून निषेध आज राज्यभरात आंदोलने करण्यात आली अमरावती शहरात हि जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धडक देत जोरदार आंदोलन केले. यावेळी केंद्रसरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आले. बबलु शेखावत यांच्या अध्यक्षतेमध्ये तसेच माजी पालकमंत्री डॉ.सुनील देशमुख,प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर,माजी महापौर .मिलिंद चिमोटे,प्रदेश उपाध्यक्ष .भैय्याजी पवार,प्रदेश सचिव आसिफ तवक्कल,महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्रीताई वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.
.याप्रसंगी जातीवादी राजकारण करणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध असो अनुराग ठाकूरचा निषेध असो अनुराग ठाकूर यांची पाठराखण करणाऱ्या नरेंद्र मोदींचा निषेध असो जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे राहुलजी गांधी आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है अश्या नारेबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुंमदुमुन गेला होता.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी / सुधांशू जोशी