आठरे पाटील स्कूलच्या कृष्णराज टेमकरची राज्याच्या फुटबॉल संघात निवड
अहमदनगर, 1 ऑगस्ट (हिं.स.) : नगर शहरातील सावेडी परिसरातील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या वसतिगृहात्मक शाळेतील ९ वी चा विद्यार्थी कृष्णराज गुरुदत्त टेमकर याची अहमदनगर जिल्हा फूटबॉल असोसिएशन च्या निवड समितीने महाराष्ट्र स्टेट वेस्टर्न इं
आठरे पाटील स्कूलच्या कृष्णराज टेमकर ची राज्याच्या फुटबॉल संघात निवड


अहमदनगर, 1 ऑगस्ट (हिं.स.) : नगर शहरातील सावेडी परिसरातील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या वसतिगृहात्मक शाळेतील ९ वी चा विद्यार्थी कृष्णराज गुरुदत्त टेमकर याची अहमदनगर जिल्हा फूटबॉल असोसिएशन च्या निवड समितीने महाराष्ट्र स्टेट वेस्टर्न इंडिया फूटबॉल असोसिएशनच्या १५ वर्षाखालील फूटबॉल संघाच्या सराव शिबीरात निवड केली होती.कृष्णराज टेमकर याची आता महाराष्ट्र राज्याच्या फूटबॉल संघात निवड झाली असून तो छत्तीसगड मधील नारायणपूर येथे होणा-या राष्ट्रीय फूटबॉल स्पर्धेत तो महाराष्ट्र राज्याच्या फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

सदर फूटबॉल संघाचे शिबीर मुंबईत सुरु होते.या शिबीरात कृष्णराज याने उत्कृष्ट कामगिरी करुन आपले महाराष्ट्र राज्याच्या फुटबॉल संघात स्थान प्राप्त केले आहे.आता तो रामकृष्ण मिशन आश्रम,नारायणपुर (छत्तीस गड ) येथे होणा-या राष्ट्रीय फूटबॉल स्पर्धेत तो महाराष्ट्र राज्याच्या फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.या विद्यार्थ्यास शाळेचे क्रीडा शिक्षक संदिप दरंदले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.कृष्णराज टेमकर या विद्यार्थ्याची महाराष्ट्र राज्याच्या फुटबॉल संघात निवड झालयाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल आठरे पाटील,कार्यकारी विश्वस्त अॅड.विश्वास आठरे पाटील व सर्व विश्वस्त,मुख्याध्यापक,प्राथमिकच्या विभाग प्रमुख,समन्वयक,पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni / सुधांशू जोशी


 rajesh pande