स्मृती मानधना आयसीसी टी-२० क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर
दुबई, 1 जुलै (हिं.स.) : भारतीय महिला क्रिकेट उपकर्णधार स्मृती मानधनाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात शानदार शतक झळकावलं होतं. आणि आता याचाच फायदा तिला आयसीसी क्रमावारी सुधारण्यात झाला आहे. महिला टी-२० आंतरराष्ट
स्मृती मानधना


दुबई, 1 जुलै (हिं.स.) :

भारतीय

महिला क्रिकेट उपकर्णधार स्मृती मानधनाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात

शानदार शतक झळकावलं होतं. आणि आता याचाच फायदा तिला आयसीसी क्रमावारी सुधारण्यात

झाला आहे. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत

ती तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.

एकदिवसीय

क्रिकेटमध्ये आधीच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मानधनाने

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात पहिले शतक

झळकावल्यानंतर ही झेप घेतली आहे. मानधनाने १५ चौकार आणि तीन षटकारांसह ६२ चेंडूत

११२ धावा केल्या होत्या. आणि नॉटिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध भारताला ९७ धावांनी

विजय मिळवून दिला होता. यजमान इंग्लिश संघाचा हा क्रिकेट टी-२०

क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला होता. त्याचप्रमाणे मानधनाने टी-२०

क्रिकेटमध्येही शतक झळकावत कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा क्रिकेटच्या तिन्ही

प्रकारात शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारी ती एकमेव भारतीय

महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande