वॉशिंग्टन डीसी, 1 जुलै (हिं.स.)
सौदी
अरेबियाच्या अल-हिलाल क्लबने मँचेस्टर सिटीला अतिरिक्त वेळेत ४-३ ने पराभवाचा धक्का दिला. फिफा क्लब विश्वचषकातील एक धक्कादायक निकालाची नोंद केली. आता उपांत्यपूर्व फेरीत
अल-हिलाल आणि ब्राझीलच्या फ्लुमिनेन्स क्लबमध्ये सामना रंगणार आहे.
अल हिलालविरुद्ध सात गोलच्या थरारक सामन्यात पराभव
पत्करल्यानंतर मँचेस्टर सिटीचं फिफा क्लब विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे.ऑर्लॅंडोमध्ये
मार्कोस लिओनार्डोने ११२ व्या मिनिटाला विजयी गोल करून सौदी अरेबियाच्या संघाला
अतिरिक्त वेळेत मँचेस्टर सिटीला पराभूत करण्यात मोलाचा वाटा उचलला. मार्कोसने या
सामन्यात ४६ आणि ११२ व्या मिनिटाला केले. तर माल्कम आणि कलिडोऊने प्रत्येकी एकेक
गोल करत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. आणि या सामन्यात सिटीकडून
बर्नार्डो सिल्वा, एर्लिंग हालँड
आणि फिल फोडेन यांनी गोल केले होते.
मँचेस्टर सिटीचा अंतिम १६ संघातील सामन्यात झालेल्या पराभवामुळे
त्यांच्या चेल्सीविरुद्धच्या ऑल-इंग्लिश उपांत्य फेरीचा सामना होण्याच्या आशाही संपुष्टात
आल्या आहेत. सौदीचा संघ आता उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी फ्लुमिनेन्सशी भिडणार
आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra